विशाखापट्टणम विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

विशाखापट्टणम विमानतळ (आहसंवि: VTZ, आप्रविको: VEVZ) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे असलेला विमानतळ आहे.येथे नौसेनेचे विमानतळ देखील आहे.

ते विशाखापट्टणमया गावापासुन सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.ते आंध्र प्रदेशमधील हैदराबादनंतर दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.त्यावर भारतीय नौसेनेचे नियंत्रण आहे, जी तेथे हवाई वाहतूक नियंत्रण व उड्डाणासाठी नागरी व सेनेच्या विमानांना सहाय्य पुरविते. आधी याची धावपट्टी६,००० फूट (१,८०० मी) लांब होती त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री टी. सुब्बिरामै रेड्डी यांनी १५ जून २००७ रोजी ६० मी (२०० फूट) रुंद व १०,५०० फूट (३,२०० मी) लांबीच्या नवीन धावपट्टीचे उदघाटन केले.

इस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या उभारणी व आखणीने जुलै २००७पासून या विमानतळात ‍रात्रीच्या भूअवतरणाची सोय झाली.ही सेवा स्पाईसजेटच्या विमानाने उदघाटीत झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →