व्हिवो कम्युनिकेशन टेक्नोलोजी कंपनी लिमिटेड' तथा व्हिवो ही एक चिनी तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी बीबीके इलेक्ट्रोनिक्सच्या पूर्ण मालकीची आहे. व्हिवो स्मार्टफोन, त्यासाठी लागणारी उपकरणे, सॉफ्टवेर आणि सेवा पुरवते. व्हिवोचे भ्रमणध्वनी हे स्वतः तयार केलेलत्या फनटच या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. ही ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइडवर आधारित आहे. ही कंपनी आपल्या भ्रमणध्वनींसाठीचे अॅप स्वतःच्या अॅपस्टोरमधून वितरीत करते.
व्हिवोचे शेन्झेन आणि नानजिंगमध्ये उत्पादन आणि संशोधन केन्द्रे असून या कंपनीत सुमारे १,६०० कर्मचारी आहेत.
ऑप्पो, रियलमी आणि वनप्लस या कंपन्या बीबीके इलेक्ट्रोनिक्सच्या मालकीच्या असून त्या व्हिवोच्या भगिनीकंपन्या आहेत.
विवो (कंपनी)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.