डॉ. विनायक रा. करंदीकर (जन्म : २७ ऑगस्ट १९१९ - १५ एप्रिल २०१३) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात प्राध्यापक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते. त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस, आणि स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. डॉ. करंदीकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्येही काम केले. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता. दैनिक ’तरुण भारत' प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते. मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही डॉ. करंदीकरांनी केले आहे. डॉ. करंदीकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नडसह अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ’इंडियन मास्टरपीस' या संपादित ग्रंथात ज्ञानदेव-तुकारामांवर करंदीकरांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनायक रा. करंदीकर
थोडक्यात पण महत्त्वाचे.