महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी साहित्य संमेलने होतात. त्यांपैकी काही ही :-
आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विद्यार्थी साहित्य संमेलन
महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन
चिंचवड येथील चैतन्य सभागृहात चार जानेवारी २०११ रोजी एक विद्यार्थी समरसता साहित्य संंमेलन झाले. संमेलनाचे उद्घाटन अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. संजीवनी तोफखाने संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या..
६वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन. ११ जानेवारी २०१४. चिंचवड येथे, अध्यक्षस्थानी सुरेश कोकीळ
७वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन, चिंचवड येथे, २४ फेब्रुवारी २०१५. संमेलनाध्यक्ष मनोहर सोनवणे.
एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन : असे एक संमेलन. चिंचवड जवळच्या आकुर्डी गावात ३-१२-२०१५ रोजी भरले होते. संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलन झाले.
समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन :
समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन
संमेलनपूर्व विद्यार्थी साहित्य संमेलन
९वे विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन चिंचवड येथे २३-१-२०१८ रोजी झाले. साहित्यिक प्रा. नरेंद्र नायडू अध्यक्षस्थानी होते
३-४ ऑक्टोबर २०१९पासून जळगावमधील मुळजी जेठा महाविद्यालयात दोन दिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. हे संमेलन मुळजी जेठा महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने झाले होते. विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिल्यानंतर हे पहिलेच संमेलन होेते.
पहा : साहित्य संमेलने
विद्यार्थी साहित्य संमेलन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.