प्राचार्य डाॅ. विजय प्रल्हाद देव (जन्म : इ.स. १९४१; - ११ एप्रिल २०१९) हे राज्यशास्त्राचे ३५ वर्षे प्राध्यापक होते. ते पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे दोनवेळा प्राचार्य झाले होते. ते लेखकही होते.
राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, दुर्गसंपदा अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले.
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळ, विद्वत् सभा, अधिसभा (Senate) आदींचे ते सदस्य होते.
गोनीदांनी (गो.नी. दांडेकर यांनी) लिहिलेल्या पुस्तकांच्या जाहीर वाचनाचा कार्यक्रम आयोजित करीत असत. मृण्मयी प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते.
विजय देव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?