वाल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
"वाल्या कोळी ते वाल्मिकी ऋषी"
जेजुरी पासून जरा पुढे गेलं की वाल्हे गावात जरा थोडंसं आत महर्षी वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे.
येथे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहित असलेल्या रामायणकार वाल्मिकी ऋषींनी समाधी घेतली आहे...याठिकाणी एक छोटे मंदिर आहे.
या मंदिराच्या बाजूला ज्या डोंगर रांगा आहेत त्यातल्याचं एका डोंगरावर वाल्याचे सात दगडी रांजण आहेत...
तिथे जायला रस्ता नाही, चार पाच किमी पायवाट तुडवत उंच डोंगर चढत जावं लागतं...
या मंदिराच्या बाहेर पिंपळाचे झाड आहे, याचं ठिकाणी वाल्याने श्री नारद मुनींना एका अडवून त्यांना लुटायचा प्रयत्न केला आणि तेथेच नारद मुनींनी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करून दिले म्हणून त्या झाडाला पवित्र मानून ते पूजले जाते...
या मंदिरातील एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात वाल्या, महर्षी वाल्मिकी ऋषी ते रामायण अशी सगळी कथा पेंटिंगच्या रुपात भिंतीवर फ्रेमच्या माध्यमातून बघायला मिळते.
वाल्हे (पुरंदर)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.