कवठे महांकाळ तालुका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कवठे महांकाळ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.

कवठे महांकाळ हा तालुका सांगली जिल्ह्यातील राजकारणातील एक प्रसिद्ध व वादग्रस्त तालुकाही मानला जातो. या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने दंडोबा, गिरलिंग, मेघराजा मंदिर, ग्रामदेवता श्री महांकाली मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व शुकाचार्य डोंगर ही देखील आहेत. तसेच कवठेमंकाळ मध्ये पद्मभूषण वसंतराव दादा पाटील जुनियर कॉलेज, श्री महांकाली हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ही विद्यालय ही आहेत. महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज या मराठी चित्रपटातील कवट्या महाकाळ या पात्राला नाव या गावावरूनच पाडले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बैलगाड्यांची शर्यत जेव्हा पुन्हा सुरू करण्यात आली त्यावेळेस सर्वात पहिले शर्यत कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावामध्ये झाली होती. कवठे महांकाळ शहरातील आगळगाव या रस्त्यालगत नवनाथ महाराजांचे मंदिर आहे या मंदिराच्या पूर्व कालीन अख्यायिका मध्ये भगवान श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या सोबत वनवासाला जाण्या वेळेस याच मंदिराच्या जागेत राहिले असल्याचे आख्यायिका मध्ये लिहिले गेले आहे. कवठे महांकाळ शहराची लोकसंख्या जवळपास २८ हजार असू शकते तरीही स्वतंत्र मतदारसंघ नाही तर तासगाव - कवठे महांकाळ मतदारसंघ असेच बोलले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →