वामनदादा कर्डक साहित्य संमेलन हे लोककवी आणि आंबेडकरी जलसाकार वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आणि त्यांच्या साहित्याचा प्रसार करण्यासाठी आयोजित केले जाणारे एक महत्त्वाचे वैचारिक व सांस्कृतिक संमेलन आहे. वामनदादांनी आपल्या कवनांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवले, त्यांच्या याच योगदानाचे स्मरण म्हणून हे संमेलन भरवले जाते. या संमेलनात प्रामुख्याने आंबेडकरी साहित्य, लोककला, जलसे आणि समकालीन सामाजिक विषयांवर चर्चासत्रे व कविसंमेलने आयोजित केली जातात.
नासिक जिल्ह्यातील सिन्नर (वामनदादांचे जन्मस्थान) आणि इतर विविध शहरांमध्ये हे संमेलन वेळोवेळी आयोजित करण्यात येते.
औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने भरविलेले पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन, १५ मे २००८ रोजी औरंगाबाद येथे झाले. डॉ. यशवंत मनोहर संमेलनाध्यक्ष होते.
वामनदादा कर्डक साहित्य संमेलन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.