वामन कर्डक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वामन तबाजी कर्डक (१५ ऑगस्ट, इ.स. १९२२ - १५ मे, इ.स. २००४, वामनदादा कर्डक नावाने प्रसिद्ध, हे मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कर्डकांनी डॉ. आंबेडकरांवर १०,०००हून अधिक गीते रचली आहेत.

लोकशाहीर वामन कर्डक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घरांघरांत खेड्यापाड्यात, वाडीतांड्यांत पोहचवण्याचे काम केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांचा विचार हा वामनदादांचा श्वास होता, ऊर्जाकेंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत वामनदादा जीवनाच्या शेवटापर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाच्या शेत शिवारात राणीसावरगाव-गंगाखेड रस्त्यावर रोड लगत समाधी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →