आयुर्वेदात वर्णन केलेल्या तीन दोषांपैकी एक दोष. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाची प्रकृतीत हे तीनही दोष थोड्याफार प्रमाणात असतात. जो दोष प्रकर्षाने असतो त्यावरून तो वात प्रकृतीचा आहे की अन्य ते ठरते.
वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छ्वास, मनातील विचार इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात.
जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात.
वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
वात
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.