वसमत विधानसभा मतदारसंघ - ९२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार वसमत मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. वसमत तालुका आणि २. औंढा (नागनाथ ) तालुक्यातील जवळाबाजार आणि साळना ही महसूल मंडळे समावेश होतो. वसमत हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे हे वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
वसमत विधानसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?