वसंत रामजी खानोलकर तथा व्ही.आर. खानोलकर (१३ एप्रिल, १८९५ - २९ ऑक्टोबर, १९७८) हे एक भारतीय रोगशास्त्रज्ञ होते. त्यांनी कर्करोग, रक्तगट आणि कुष्ठरोग या विषयांच्या अभ्यासात आणि रोगशास्त्रामध्ये मोठे योगदान दिले. त्यांना भारतातील रोगशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनाचे जनक मानले जाते.
खानोलकरांचा जन्म १३ एप्रिल १८९५ रोजी एका गोमंतक मराठा कुटुंबात झाला. त्यांनी लंडन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि १९२३ मध्ये रोगशास्त्र विषयात एम.डी. पदवी संपादन केली. त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सेठ जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये रोगशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.
ते टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे प्रयोगशाळा व संशोधन संचालक होते. त्यांनी भारत सरकाराने त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक म्हणून दहा वर्षे काम केले. त्यांनी भारतीय कर्करोग संशोधन केंद्राच्या उभारणीत मदत केली आणि १९७३ पर्यंत त्याचे संचालक म्हणून काम पाहिले.
ते इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी कर्करोग आणि कुष्ठरोगावर तीन पुस्तके आणि १०० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित केले.
भारत सरकारने १९५४मध्ये पद्मश्री आणि १९५५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
२९ ऑक्टोबर १९७८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९८७ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान अकादमीतर्फे डॉ. व्ही.आर. खानोलकर व्याख्यानमाला सुरू करण्यात आली.
वसंत रामजी खानोलकर
या विषयावर तज्ञ बना.