वसंत नारायण मंगळवेढेकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर (११ डिसेंबर, इ.स. १९२५ - एप्रिल १, २००६:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →