लौजी हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यम रेल्वेवरील कर्जत-खोपोली दरम्यानचे खोपोलीच्या आधीचे स्थानक आहे. खोपोलीहून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी कर्जत-कल्याणमार्गे जाणाऱ्या दररोजच्या सहा उपनगरी गाड्या लौजीला थांबतात. त्यांतील पाच लोकल जलद आहेत तर एक लोकल धिमी आहे. लौजी हे गाव रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात येते. हा भाग अविकसित, डोंगराळ आहे. येथे फार कमी लोकसंख्या आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लौजी रेल्वे स्थानक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.