लोकसभेचा अध्यक्ष

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी सभापतीवर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा सभापती लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो.

सुमित्रा महाजन ह्या लोकसभेच्या माजी सभापती आहेत. ओम बिर्ला हे १८व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →