लेयटे आखाताची लढाई

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लेयटे आखाताची लढाई

लेयटे आखाताची लढाई (मराठी नामभेद: लेयटे गल्फची लढाई ; इंग्लिश: Battle of Leyte Gulf, बॅटल ऑफ लेयटे गल्फ) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे आणि शाही जपानी आरमार यांच्यात फिलिपिन्सजवळील लेयटे आखातात लढली गेलेली आरमारी लढाई होती. ही लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती आणि काही हिशोबाप्रमाणे ही जगाच्या इतिहासातीलच सगळ्यात मोठी आरमारी लढाई होती.

ही लढाई चार टप्प्यांत चार ठिकाणी लढली गेली: सिबुयान समुद्राची लढाई, सुरिगाओ आखातची लढाई, समारची लढाई, केप एन्गान्योची लढाई.

यांशिवाय आसपासच्या प्रदेशात अनेक झटापटीही झाल्या.

युद्धाच्या सुरुवातीस जपानने आग्नेय आशियातील अनेक प्रदेश हस्तगत करून तेथील तेलसाठे व खनिज संपत्ती मिळवलेली होती. जपानचे बरेचसे युद्धतंत्र या सामग्रीवर आधारित होती. येथून जपानकडे जाणारी ही रसद तोडण्यासाठी दोस्त राष्ट्रांना फिलिपिन्स जिंकून तेथे तळ उभारणे गरजेचे होते. यासाठी अमेरिकेने २० ऑक्टोबर रोजी लेयटे बेटावर चढाई केली. हे पाहताच जपानी आरमाराने आपली शक्ती एकवटून प्रतिहल्ला केला. पण अमेरिकन आरमाराच्या तिसऱ्या आणि सातव्या तांड्याने हा प्रतिहल्ला उधळून लावला. ही लढाई संपताना जपानकडे असलेल्या विमानांची संख्या अमेरिकेच्या युद्धनौकांच्या संख्येपेक्षाही कमी झाली. येथून पुढे जपानला समुद्रात लढायला बळच उरले नाही. या लढाईत जपानी आरमाराचीही इतकी हानी झाली, की युद्धाच्या अंतापर्यंत ते यातून सावरलेच नाही .

या लढाईत जपानी वैमानिकांनी सर्वप्रथम कामिकाझे हल्ले चढवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →