लेडी बर्ड जॉन्सन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

लेडी बर्ड जॉन्सन

क्लॉडिया अल्टा "लेडी बर्ड" जॉन्सन (पुर्वाश्रमीच्या टेलर; २२ डिसेंबर १९१२ - ११ जुलै २००७) या अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांच्या पत्नी म्हणून १९६३ ते १९६९ या काळात अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या. त्यापूर्वी, १९६१ ते १९६३ या काळात त्या अमेरिकेच्या द्वितीय महिला होत्या, जेव्हा त्यांचे पती राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या नेतृत्वाखाली उपराष्ट्राध्यक्ष होते.

१९३४ मध्ये ऑस्टिन, टेक्सास येथे राजकारणात येऊ पाहणारे लिंडन जॉन्सन यांच्याशी विवाह केल्यानंतर, त्यांनी मिळालेल्या थोड्याशा वारसा हक्काने त्यांच्या काँग्रेसच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी निधी पुरवला आणि नंतर लिंडन नौदलात सेवा करत असताना त्यांचे कार्यालय पण सांभाळले.

प्रथम महिला म्हणून, जॉन्सन यांनी काँग्रेसशी थेट संवाद साधून, स्वतःचा प्रेस सेक्रेटरी नेमून आणि एकट्याने निवडणूक प्रचार दौरा करून नवे पायंडे पाडले. त्यांनी देशातील शहरे आणि महामार्ग सुशोभित करण्याचे समर्थन केले "जिथे फुले फुलतात, तिथे आशाही फुलते", असे त्यांनी म्हटले होते. महामार्ग सुशोभीकरण कायदा अनौपचारिकपणे "लेडी बर्ड्स बिल" म्हणून ओळखला जात होता. त्यांना १९७७ मध्ये प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम आणि १९८४ मध्ये काँग्रेस गोल्ड मेडल, हे अमेरिकन नागरिकाला दिले जाणारे सर्वोच्च सन्मान मिळाले. इतिहासकारांच्या मूल्यांकनानुसार , सिएना कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अधूनमधून होणाऱ्या सर्वेक्षणांमध्ये जॉन्सन यांना सातत्याने सर्वात आदरणीय अमेरिकन प्रथम महिलांपैकी एक म्हणून स्थान दिले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →