लुइसा मारिया फ्रांसिस्का दे गुझमान इ सँदोव्हाल ( पोर्तुगीज: Luísa Maria Francisca de Gusmão ; १३ ऑक्टोबर, १६१३:सानलुकार, स्पेन - २७ फेब्रुवारी, १६६६, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही पोर्तुगालचा राजा चौथ्या होआवची राणी होती. लुइसाची दोन मुले, अफोन्सो सहावा आणि पेद्रो दुसरा पोर्तुगालचे राजे झाले तर तिची मुलगी कॅथरीन इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सशी झालेल्या लग्नाद्वारे इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी झाली. लुइसाने अफोन्सोच्या सत्ताकाळा १६५६-६२ अधिकृतपणे आणि नंतर आपल्या मृत्यूपर्यंत पडद्याआडूनपोर्तुगालचा कारभार पाहिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुइसा दे गुझमान
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?