लीना चंदावरकर (२९ ऑगस्ट, १९५०:धारवाड, कर्नाटक, भारत - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. हिने मुख्यत्वे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. तिचा जन्म कर्नाटकमधील धारवाड येथे एका लष्करी अधिकाऱ्याच्या कुटुंबात झाला. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरातींमधून केली आणि त्यानंतर सुनील दत्त यांच्या मन का मीत (१९६८) या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या सौंदर्यामुळे आणि अभिनय कौशल्यामुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली. चंदावरकरने आपल्या कारकिर्दीत राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र आणि संजीव कुमार यांसह अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले. महबूब की मेहंदी (१९७१), मनचली आणि बैराग (१९७६) हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत.
चंदावरकरचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत चढ-उतारांचे आणि संघर्षाचे राहिले आहे. तिचे लग्न वयाच्या २५व्या वर्षी गोव्यातील एका राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकरशी झाले. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच सिद्धार्थचा अपघाती गोळीबारात मृत्यू झाला आणि चंदावरकरला वयाच्या पंचविसाव्या वर्षी वैधव्य आले. त्यानंतर काही वर्षांनी तिने पार्श्वगायक किशोर कुमारशी लग्न केला. किशोर कुमार यांच्याशी लग्न करण्यास त्यांच्या वडिलांचा सुरुवातीला विरोध होता, कारण किशोर कुमार यांचे हे चौथे लग्न होते आणि ते लीना यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते; परंतु नंतर त्यांनी या विवाहास संमती दिली. लीना आणि किशोर कुमार यांना सुमीत नावाचा मुलगा आहे. १९८७ मध्ये किशोर कुमार यांच्या निधनानंतर त्या वयाच्या ३७व्या वर्षी पुन्हा विधवा झाल्या. सध्या त्या मुलगा सुमीत आणि सावत्र मुलगा अमित कुमार व त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात.
लीना चंदावरकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?