लिंगभाव अभ्यास

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

लिंगभाव अभ्यास हे एक आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे विद्यापीठीय क्षेत्र आहे, ह्यामध्ये लिंगभावाच्या अस्मितांचा आणि लिंगभावांच्या सादरीकरणाच्या संदर्भातील अभ्यास केले जातात. ह्यामध्ये लिंगभाव हा कोटीक्रम आकलनाच्या आणि विश्लेषणाचा केंद्रबिंदू असतो. ह्यामध्ये स्त्री अभ्यास (ज्याचा संबंध स्त्रिया, स्त्रीवाद, लिंगभाव, राजकारण इत्यादींशी येतो.), पुरुष अभ्यास, आणि लैंगिक अल्पसंख्यांकांचा अभ्यास यांचा अंतर्भावही होतो. काहीवेळा लिंगभाव अभ्यास लैंगिकता अभ्यासाच्या बरोबरीने मांडला जातो. ह्या विद्याशाखांमध्ये लैंगिकता, लिंगभाव ह्या अभ्यास विषयांमध्ये वाङमय, भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, चित्रपट अभ्यास, मानवी विकास, कायदा, अर्थसंकल्प आणि वैद्यकिय शास्त्र ह्या सगळ्याचा विचार अभ्यासला जातो. ह्यामध्ये वांशिकता, वर्ण, प्रदेश, राष्ट्रियता आणि विकलांगता यांचाही विचार केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →