प्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्यास संस्था आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच मधुकर ढवळीकर हे ही प्राच्यविद्या संशोधक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्राच्यविद्या
थोडक्यात पण महत्त्वाचे.