ललित सोनोने

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ललित सोनोने

JJwiki108.208 (चर्चा) १३:१८, ४ मार्च २०२१ (IST)



ललित सोनोने यांचा जन्म अमरावती जिल्ह्या नजीक च्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथे ११-१०-१९३८ला झाला. आजोबांच्या काळापासूनच त्यांच्या घरात निरामय असे धार्मिक वातावरण होते म्हणून वडिलांना भजनाचा छंद होता. ते चांगले तबलावादकहि होते. अश्या वातावरणात सूर ,ताल व शब्द त्यांच्या मनात खोलवर रुजू होत गेले.

कविभूषण अण्णासाहेब खापर्डे यांच्या नंतर कविवर्य मधुकर केचे , गझलसम्राट सुरेश भट,शरदचंद्र सिंन्हा ,उ.रा.गिरी ,तुळशीराम काजे ,मनोहर तल्हार , बाबा मोहोड, श्याम सोनारे या कवींच्या सहवासात त्यांना काव्यलेखना कडे विशेष आकर्षण झाले आणि छंदबद्ध कविता लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.

होस्टेलवरच असतांना टाकळगांवचे जगन वंजारी हे त्यांचे मित्र बनले. ते त्यांचे नातेवाईकही होते. साहित्याची आवड लागत गेली व वाचन सुरू झाले .

१९५८ला अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात बी.ए च्या प्रथम वर्षला शिकत असतांना महाविद्यालयात सुरेश भट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कवीसंमेलनात त्यांनी आपली कविता सादर केली या कवितेला मिळालेली सुरेश भटांची दाद व "तू छान कविता लिहितोस .आता नव्याने काळजाचा ठाव घेणारी गझल लिहायला लाग " हा सल्ला त्यांना प्रोत्साहन देणारा ठरला .

वर्ष १९६३ ते ६७ ह्या काळात वडील व आई यांचे निधन झाले त्यामुळे नैराश्याग्रस्थ होऊन त्यांनी काव्यलेखनाला विराम देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचे जीवलग मित्र साहित्यिक व पत्रकार जगन वंजारी हे त्यांना भेटायला त्यांच्या गावी आले व "तू शब्दसृष्टीचा कलावंत आहेस. तुला तुझ्या कवितेचे महत्त्व वाटत नसले तरी माझ्यासारखे कित्तेक रसिक तुझ्या कवितेवर जीव ओवाळून टाकतात " असे म्हणून त्यांनी ललित सोनोने यांना पुन्हा गझल व कविता लिहिण्यास मनवले व ते पुन्हा जोमाने कविता लिहायला लागले.

त्यांनी १९८९ साली आपला पहिला कवितासंग्रह 'चांदनवेल ' प्रकाशित केला.अर्धांगिनीच्या मृत्यू नंतर त्यांना एकाकीपण जाणवू लागले मात्र या पुढे जाऊन २०१२ मध्ये 'एक वलय दुःखाचे ' हा गझलसंग्रह प्रकाशित केला .

अलीकडेच त्त्यांची कविता अमरावती विद्यापीठाच्या बी.कॉमच्या ३ ऱ्या वर्षीच्या अभयसक्रमातही सामील करण्यात अली. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध अ.भा.मराठी गझल साहित्य संमेलना पासून येत गेला होताच त्यांचे ललित सोनोने बद्दलचे मनोगत एक वलय दुःखाचे या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.

जेव्हा जगन वंजारी साहित्य जत्रा चालवायला लागले तेव्हा त्यांनी सोनोनेंच्या बऱ्याच कविता व गझला प्रकाशित करून त्यांना भरपूर प्रसिद्धी दिली डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दै .लोकमतने काढलेल्या एका खास पुरवणीच्या कव्हर पेज वर त्यांची 'ज्ञानसूर्य ' ही गझल प्रकाशित झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →