लमार काउंटी, अलाबामा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लमार काउंटी, अलाबामा

लमार काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हरनॉन येथे आहे. या काउंटीला मिसिसिपीच्या सेनेटर लुसियस क्विंटस सिनसिनाॅटस लमारचे नाव दिले आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९७२ इतकी होती.

लमार काउंटीची रचना जोन्स काउंटी नावाने ४ फेब्रुवारी, १८६७ रोजी झाली. १३ नोव्हेंबर, १८६७ रोजी ही काउंटी विसर्जित करण्यात आली. ८ ऑक्टोबर, १८६८ रोजी याची पुनर्रचना सॅनफर्ड काउंटी नावाने झाली. ८ फेब्रुवारी, १८७७ रोजी या काउंटीला लमार काउंटी नाव दिले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →