राजे लखुजीराव जाधव
(जन्म: अंदाजे इ.स.१५७०- इ.स. १६२९)
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवाजी महाराज यांच्या आधीच्या काळात विशिष्ट परिस्थितीत अहमदनगरची निजामशाही आणि बीजापूरचीआदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कुळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, फलटणचे नाईक निंबाळकर, सरनाईक, पवार ही कुळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखुजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडची देशमुखी मिळवली होती. खिलजी (दिल्लीसुलतान) राजांच्या राजवटीत यादव राज्य नष्ट झाले, परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या जिजाबाई पोटी प्रथमतःच स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आलला. शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.
लखुजी जाधव
या विषयावर तज्ञ बना.