टॉवर ऑफ लडन, लंडनचा टॉवर तथा हिज मॅजेस्टीझ रॉयल पॅलेस अँड द फोर्ट्रेस ऑफ द टॉवर ऑफ लंडन किंवा लंडनचा किल्ला हा इंग्लंडची राजधानी लंडन शहरातील एक ऐतिहासिक गढी वजा किल्ला आहे. मध्य लंडनमध्ये थेम्स नदीच्या उत्तर तीरावर असलेला हा किल्ला टॉवर हॅमलेट्स या बरोमध्ये आहे. लंडन शहराच्या पूर्वेस टॉवर हिलच्या पलीकडे असलेला हा किल्ला नॉर्मन विजयाच्या शेवटी १०६६ साली बांधला गेला. शेवटी त्याची स्थापना झाली. या किल्ल्यातील व्हाइट टॉवर हा बुरुज १०७८मध्ये विल्यम द कॉन्कररने बांधला होता. हा किल्ला आणि त्याचे बुरुज त्यावेळच्या स्थानिक सॅक्सन जनतेवर जरब बसवत असे. इंग्लंडच्या राजाचा राजवाडा म्हणून बांधायला घेतलेल्या या किल्लाचा ११०० सालापासून ((रानुल्फ फ्लॅम्बार्ड) पासून १९५२ (क्रे जुळी भावंडे) पर्यंत या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर केला गेला.
या किल्ल्यात अनेक इमारती आणि तटबंद्या आहेत. दोन खंदकांच्या आत असलेल्या या इमारती मुख्यत्वे १२व्या आणि १३व्या शतकात पहिला रिचर्ड, तिसरा हेन्री आणि पहिल्या एडवर्डच्या राज्यकालात बांधल्या गेल्या.
इंग्लंडच्या इतिहासात टॉवर ऑफ लंडनला महत्वाचे स्थान आहे. ज्याच्या ताब्यात हा किल्ला होता त्याच्या हातात देशावरील सत्ता होती. या किल्ल्याचा उपयोग शस्त्रागार, खजिना, प्राणी संग्रहालय,टाकसाळ, शासकीय कागदपत्रांचे कार्यालय अशा विविध प्रकारे केला गेला आहे.
१६व्या आणि १७व्या शतकात टॉवर ऑफ लंडन मुख्यत्वे महत्वाच्या कैद्यांना डांबण्याचा तुरुंग होता. येथे पहिली एलिझाबेथ, सर वॉल्टर रॅले, एलिझाबेथ थ्रॉकमॉर्टन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्याकाळच्या धर्मगुरू आणि सनसनाटी लिखाण करणाऱ्या लेखकांनी टॉवर ऑफ लंडन हे यातनागृह आणि कत्तलखाना अशी प्रसिद्धी दिली होती. वस्तुतः दुसऱ्या महायुद्धापर्यंत फक्त सात कैद्यांना येथे मृत्युदंड दिला गेला होता. किल्ल्याबाहेरील टॉवर हिल या टेकडीवर इतर ११२ लोकांना मृत्युदंड दिला गेला होता.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात किल्ल्यात टाकसाळ आणि इतर संस्था किल्ल्याबाहेर गेल्या तेव्हा त्याचे रूप बदलून पुन्हा मूळ स्वरुपात आणले केले.
लंडनचा टॉवर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.