रॉय हॉजसन (इंग्लिश: Roy Hodgson; ९ ऑगस्ट, १९४७ (1947-08-09); क्रॉयडन, इंग्लंड) हा एक माजी इंग्लिश फुटबॉलपटू व इंग्लंड फुटबॉल संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २०१२ सालापासून इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या हॉजसनने ह्यापूर्वी १९९२-९५ दरम्यान स्वित्झर्लंड, २००२-०४ दरम्यान संयुक्त अरब अमिराती व २००६-०७ दरम्यान फिनलंड ह्या राष्ट्रीय फुटबॉल संघांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले होते. ह्या व्यतिरिक्त हॉजसन इंटर मिलान, ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी., एफ.सी. कोपनहेगन, उदिनेस काल्सियो, फुलहॅम एफ.सी., लिव्हरपूल एफ.सी. व वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. ह्या युरोपमधील आघाडीच्या क्लबांचा देखील प्रशिक्षक राहिला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉय हॉजसन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.