मेजर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह (२९ सप्टेंबर, इ.स. १७२५:स्टिश हॉल, मार्केट ड्रेटन, श्रॉपशायर, इंग्लंड - २२ नोव्हेंबर, इ.स. १७७४:बर्कली स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश सैन्याधिकारी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. भारतात ब्रिटिशांचा अंमल सुरू करण्यात क्लाइव्हने वॉरन हेस्टिंग्ससह सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश राजवट आणल्यावर त्याने येथील अमाप संपत्ती लुटून ब्रिटिश राजवटीस दिली. याबद्दल त्याला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले परंतु त्याचबरोबर स्वतःची तुंबडीही भरून घेतल्याबद्दल त्याच्यावर ब्रिटिश संसदेत खटलाही चालविण्यात आला. आपल्या अंमलादरम्यान क्लाइव्हने बंगालमध्ये अतोनात अत्याचार करविले. त्याने लादलेले अचाट कर आणि शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळ आणि इतर रोख पिके लावण्यास भाग पाडल्यामुळे तेथील दुष्काळास भयानक परिमाण मिळाले व त्यात लाखो भारतीय लोक मृत्यू पावले. नीरद सी. चौधरी या इतिहाससंशोधकाच्या मते बंगालमध्ये आधीच मोगल, मराठे आणि अफगाणी राज्यकर्त्यांनी अत्याचार चालविलेले होते त्यात उच्चवर्णीय हिंदूंच्या लोभीपणाने इतरेजनांची आधीच धूळधाण उडालेली होती आणि क्लाइव्हने त्यास आळा घातला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉबर्ट क्लाइव्ह
या विषयावर तज्ञ बना.