रॉबर्ट तोरू कियोसाकी (जन्म: ८ एप्रिल, १९४७) हे एक अमेरिकन व्यावसायिक, उद्योजक आणि लेखक आहेत. रिच डॅड पुअर डॅड हे त्यांनी लिहिलेले जगातील सर्वात लोकप्रिय आर्थिक साक्षरतेवरील पुस्तक आहे. याच सोबत त्यांनी 'रिच डॅड कंपनी'ची स्थापना केली. ज्याद्वारे ते पुस्तके आणि व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांना वित्त व्यवस्थापन आणि व्यवसायाचे शिक्षण देतात. यासोबतच त्यांनी 'रिच ग्लोबल एलएलसी' ही कंपनीही सुरू केली होती, परंतु २०१२ मध्ये या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. नंतर कियोसाकी यांच्या सेमिनारला उपस्थित राहिलेल्या लोकांनी त्यांच्यावर सामूहिक दावा दाखल केला होता.
कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, डब्लूटीएइ टीव्ही आणि सीबीएस न्युज यांसारख्या प्रसिद्ध वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या व्यावसायिक पद्धतींवर शोधपत्रकारीतेवर आधारित माहितीपट प्रसारित केले आहेत.
रॉबर्ट कियोसाकी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.