रॉचेस्टर (न्यू यॉर्क)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रॉचेस्टर (न्यू यॉर्क)

रॉचेस्टर (इंग्लिश: Rochester) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (न्यू यॉर्क शहर व बफेलोखालोखाल). न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात (अपस्टेट न्यू यॉर्क) ओन्टारियो सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इतकी लोकसंख्या असलेले रॉचेस्टर महानगर क्षेत्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अनेक अहवालांनुसार रॉचेस्टर हे निवासाकरिता, शिक्षणाकरिता व व्यापाराकरिता अमेरिकेतील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. येथील वैद्यकीय व तंत्रज्ञान शिक्षणासाठी व संशोधनासाठी रॉचेस्टर जगप्रसिद्ध आहे. येथे जॉर्ज ईस्टमनने स्थापन केलेल्या ईस्टमन कोडॅक कंपनीचे मुख्यालय आहे. जेनेसी नदी या शहरातून वाहत ऑन्टॅरियो सरोवरास मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →