रेडिंग ( ) हे इंग्लंडच्या बर्कशायर काउंटीमधील एक शहर आहे.थेम्स आणि केनेट नद्यांच्या संगमावर थेम्सच्या खोऱ्यात वसलेले हे शहर लंडनपासून ६४ किमी पश्चिमेस, स्विंडनपासून ६४ किमी पूर्वेस आणि ऑक्सफर्डपासून ४० किमी दक्षिणेस आहे.
रेडिंग हे थेम्स खोऱ्यातील एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे. येथे विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि विमाकंपन्याची आवारे आहेत. हे एक प्रादेशिक विक्री केंद्र देखील आहे. रेडिंग विद्यापीठाचे मुख्य आवार येथे आहे. रेडिंग एफ.सी. येथील असोसिएशन फुटबॉल संघ आहे.
जागतिक ऑषध कंपनी बायर लाइफ सायन्सेसने २०१६मध्ये आपले मुख्यालय रेडिंगच्या ग्रीन पार्क बिझनेस पार्कमध्ये हलवले इंटरनॅशनल कॉम्प्युटर्स लिमिटेड आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनच्याया माहिती तंत्रज्ञान कंपन्या रेडिंगमध्ये अनेक दशके आहेत. यांशिवाय हुआवेई टेक्नोलॉजीझ, पेगासिस्टम्स, सीजीआय इंक, अॅजिलंट टेक्नोलॉजीझ, सिस्को, एरिक्सन, सिमँटेक, वेरायझन बिझनेस व इतर अनेक कंपन्यांची आवारे येथे आहेत.
इंग्लिश लेखिका जेन ऑस्टेनने १७८४-८६ दरम्यान येथील अॅबे गेटवे या शाळेच्या रीडिंग लेडीज बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. थॉमस हार्डीने रेडिंगचे वर्णन आपल्या लेखनात 'अल्डब्रिकहॅम' नावाने केले आहे.
ऑस्कर वाइल्ड १८९५ ते १८९७ दरम्यान रेडिंग तुरुंगात कैद होते. तेथे असताना त्यांनी डी प्रोफंडिस हे पत्र लिहिले. सुटकेनंतर फ्रांसमध्ये राहून त्यांनी रेडिंग तुरुंगात पाहिलेल्या चार्ल्स वूल्ड्रिजच्या फाशी वर आधारित द बॅलड ऑफ रीडिंग गॅओल हे पुस्तक लिहिले. रेडिंगच्या रहिवासी रिकी जर्व्हेसने आपला सिमेटरी जंक्शन हा १९७०चे रेडिंग ही पार्श्वभूमी असलेला आणि ईस्ट रेडिंगमधील एका व्यस्त भागाचे
चित्रण असलेला चित्रपट बनवला.
रेडिंग (बर्कशायर)
या विषयातील रहस्ये उलगडा.