'रेखा' या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत (–, १९३३ - ११ जानेवारी, २०२२) या एक मराठी अभिनेत्री होत्या.
मराठी चित्रपटसृष्टीत एके काळी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन सख्ख्या बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर, आणि चित्रा म्हणजे कुसुम सुखटणकर. सचिन शंकर यांच्या बॅलेमधून काम करता करता रेखा अभिनय क्षेत्रात आल्या. राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून नायिका म्हणून त्यांनी रेखा या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले(इ.स. १९५२). चित्रपटलेखक ग.रा. कामत यांच्याशी विवाह (१९५३) केल्यानंतर रेखा यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या. अभिनेत्री म्हणून देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा लाभलेल्या रेखा आज(२०१४ साली) काही मालिका आणि चित्रपटांतून प्रेमळ आजीच्या भूमिकांत दिसतात.
रेखा कामत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.