रुपिणी (मूळ नाव:कोमल महुवाकर) ही एक भारतीय माजी अभिनेत्री आहे. तिने १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले होते.
महुवाकरचा जन्म मुंबईत एका सुशिक्षित कुटुंबात झाला. तिचे वडील वकील होते आणि आई आहारतज्ज्ञ होती. तिने वयाच्या चौथ्या वर्षी मुंबईतील लच्छू महाराजांकडून नृत्य शिकण्यास सुरुवात केली. तिने भरतनाट्यम, कुचीपुडी, ओडिसी आणि कथकसह सर्व शास्त्रीय नृत्य प्रकार अल्पावधीतच शिकले.
रुपिणी
या विषयावर तज्ञ बना.