रिटा विल्यम्स-गार्सिया

या विषयावर तज्ञ बना.

रीटा विल्यम्स गार्सिया (जन्म १९५७) या अमेरिकन लेखिका आहेत, ज्या मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी कादंबरी लेखन करतात. २०१० साली नॅशनल बुक अवॉर्ड्सच्या अंतिम यादीमध्ये त्यांच्या ‘जंप्ड’ या कादंबरीचा समावेश होता. त्यांच्या वन क्रेझी समर या पुस्तकाने २०११ साली न्यूबेरी ऑनर अवॉर्ड, कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड, आणि आणि इतिहासावर आधारित काल्पनिक कथेसाठी दिला जाणारा स्कॉट ओ'डेल अवॉर्ड हे अवॉर्ड्स जिंकले.. त्यांना पेन/ नॉर्मा क्लाईन अवॉर्डही मिळाला आहे. २०१३ साली लिहिलेल्या पी.एस. बी इलेव्हन या त्यांच्या पुस्तकाची ज्युनिअर लिटररी गिल्डसाठी निवड झाली होती. तसेच ते न्यू यॉर्क टाईम्स एडिटर्स चॉइस बुक ठरले. तर याच पुस्तकाने २०१४ सालचा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड जिंकला. २०१६ सालचा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड त्यांच्या गॉन क्रेझी इन अलाबामा या पुस्तकाने जिंकला. २०१७ साली नवतरुणांच्या साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या नॅशनल बुक अवॉर्डच्या अंतिम यादीमध्ये त्यांच्या क्लेटन बर्ड गोज अंडरग्राउंड या पुस्तकाचा समावेश होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →