रा.ना. चव्हाण

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रामचंद्र नारायण चव्हाण ( वाई इ.स. १९१३ - मृत्यू: १० एप्रिल, इ.स. १९९३, पुणे) हे मराठी लेखक आणि दलित चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८०० च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी रानांवर 'रा.ना.चव्हाण यांचे विचारधन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. मो.नि. ठोके यांनी रा.ना. चव्हाण यांचे निवडक वाङ्मय संपादित करून प्रकाशित केले आहे.

त्यांनी सर परशुराम महाविद्यालय, पुणे सन १९३६ - ३७ साली एफ.वाय. परीक्षा पास केली.

रा.ना. चव्हाण यांना रवींद्र, शरच्चंद्र आणि रमेश या नावाचे तीन पुत्र आहेत.



रा.ना. चव्हाण यांच्या १० एप्रिल या स्मृतिदिनी त्यांचा किंवा त्यांच्याविषयी दरवर्षी एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. असे प्रसिद्ध झालेले ग्रंथ



स्मृतिग्रंथ (रानांच्या आठवणी). (१९९४)

जनजागरण (रानांचे निवडक लेख). (१९९५)

सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग १ला (रानांचे धर्मचिंतनपर लेख) (१९९६)

सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग २रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९७)

सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग ३रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९८)

प्रबोधन (रानांचे ऐतिहासिक चिंतनपर लेख)(१९९९)

परिवर्तनाची क्षितिजे (रानांचे निवडक लेख) (२०००)

महर्षी शिंदे : शोध व बोध (२००१)

राजर्षी शाहू कार्य व काळ (२००२)

रा.ना. चव्हाण विचारबोध (संकलन-२००३)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →