गजमल माळी राऊत (जन्म : इ.स. १९३४; - आौरंगाबाद, २८ फेब्रुवारी, इ.स. २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी व नाटककार असून चिंतनपर मानवतावाद या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक होते. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे ते माजी अध्यक्ष असून शिक्षणतज्ज्ञ आणि मुद्रण व्यवसायात आघाडीचे प्रणेते होते.
प्राचार्य गजमल माळी हे सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्तेही होते. ऑरंगाबाद येथील कॉलेजचे स्थापनेपासून १५ जून १९७१ ते ३१ मार्च १९९४पर्यंत ते प्राचार्य होते. तरुण लेखकांना सतत प्रोत्साहन देणारे आणि लिहिते करणारे प्राध्यापक, साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे तीन काव्यसंग्रह, पाच संपादित ग्रंथ, लोकसाहित्य शब्दकोषाचे संकलन व सत्यशोधक समाजावरील पुस्तके आहेत.
अजिंठा लेण्यांच्या परिसरात फुललेली रॉबर्ट गिल (अजिंठा लेणी प्रकाशात आणणारे ब्रिटिश अधिकारी) आणि पारो यांची प्रेमकहाणी ‘कल्पद्रुमाची डहाळी’ या नाटकातून गजमल माळींनी लिहिली. तिच्यावरून ‘पारू’ हा चित्रपट निघाला.
गजमल माळी ह्यांचा ‘राष्ट्रीय काँग्रेस आणि सत्यशोधक समाज’ हा त्यांचा वैचारिक ग्रंथ काँग्रेस आणि सत्यशोधक समाज यांच्या संबंधांवर प्रकाश टाकतो. या पुस्तकातून बराचसा अज्ञात इतिहास समाजासमोर आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज काँग्रेसकडे कसा वळला आणि त्याचे हे वळणे ही सामाजिक अभिसरणाची सुरुवात कशी होती, याचे विवेचन प्रा. माळी यांनी या वैचारिक ग्रंथातून केले आहे.
प्राचार्य गजमल माळी हे ‘राजकीय सत्तांतर’ या सामाजिक-राजकीय विषयाला वाहिलेल्या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक होते. सत्यशोधक चळवळीतील उपेक्षित, समर्पित कार्यकर्त्यांची त्यांनी आदरपूर्वक दखल घेतली. ते केवळ लेखक नव्हते, तर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.
गजमल माळी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.