राहुल बजाज

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राहुल बजाज

राहुल बजाज (जून १०, इ.स. १९३८ कलकत्ता , १२ फेब्रुवारी २०२२, पुणे) यांचा जन्म, सावित्री आणि कमलनयन बजाज या मातापित्यांच्या पोटी, कलकत्ता येथे १० जून १९३८ रोजी मारवाडी कुटुंबात झाला. व्यावसायिक असलेल्या या मारवाडी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय संपन्न होती. ते बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना २००१ साली पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रूपा घोलप या महाराष्ट्रीयन तरुणीशी १९६१ साली राहुल यांचा विवाह झाला. रूपा या त्या काळातील सौंदर्यवती व नवोदित मॉडेल होत्या. राहुल व रूपा यांना राजीव (जन्म - १९६६), संजीव (जन्म - १९६९), सुनयना केजरीवाल (जन्म-१९७१) ही तीन मुले आहेत. हे भारतामधील एक उद्योजक आहेत. बजाज ऑटो या कंपनीचे ते संचालक आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यानच्या काळात राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. त्यांची मुलगी सुनयना यांचा विवाह तेमाझेक इंडिया चे माजी प्रमुख मनीष केजरीवाल यांच्याशी झाला.

राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. राहुल यांच्या आजोबांना महात्मा गांधी आपला पाचवा पुत्र मानत असत. जमनालाल बजाज हे जवाहरलाल नेहरू यांचेही खूप जवळचे मित्र होते. काँग्रेस पक्षाच्या उभारणीत व राष्ट्रीय चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे होते. बजाज आणि नेहरू या घराण्याचे गेल्या तीन पिढ्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. कमलनयन आणि इंदिरा गांधी दोघे काही काळ एकाच विद्यालयात शिकत होते. कमलनयन यांच्या पहिल्या अपत्याचे राहुल हे नाव स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी सुचवलेले आहे. राहुल यांचे बालपण अतिशय शिस्तीच्या वातावरणात गेले. कमलनयन बजाज हे महात्मा गांधींच्या वर्ध्यातील संन्याशी आश्रमात वाढले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →