अरविंद गोविंद राम केजरीवाल (जन्म : हिस्सार, हरियाणा, १६ ऑगस्ट १९६८ ) हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, आम आदमी पार्टीचे संस्थापक व पक्षाध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत.
त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरीमध्ये असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले. त्यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयकर विभागामध्ये सहआयुक्त या पदावर काम केले.
माहिती अधिकाराचा कायदा व जनलोकपाल संमत व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारे सोबत काम केले. इ.स. २००६ साली लक्षवेधी नेतृत्वासाठी त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रेमन मॅगसेसे पुरस्काराचा निधी दान करून, अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेची इ.स. २०१२मध्ये स्थापना केली.
अरविंद केजरीवाल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.