राहुल देव (जन्म २७ सप्टेंबर १९६८) हा एक भारतीय अभिनेता आणि माजी मॉडेल आहे जो प्रामुख्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने काही मराठी, बंगाली, भोजपुरी, गुजराती, पंजाबी आणि उडिया चित्रपटाता देखील काम केले आहे.
राहुल देव आणि त्याचा भाऊ मुकुल देव हे दोघेही हरिदेव यांचे पुत्र असून ते सहायक पोलिस आयुक्त होते.
त्याने २००० च्या चॅम्पियन चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले जेथे त्याने खलनायकी भूमिका केली होती ज्यासाठी त्याला २००१ च्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
डिसेंबर २०१३ मध्ये पौराणिक टीव्ही मालिका देवों के देव...महादेव मध्ये अरुणासुर राक्षसाची भूमिका साकारून, टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्याने बिग बॉस (हिंदी सीझन १०) मध्ये भाग घेतला आणि ६३ व्या दिवशी बाहेर पडला.
राहुल देव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.