ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे (१० जून, इ.स. १९२८:पाडळी, सिन्नर तालुका, महाराष्ट्र - २६ जानेवारी, इ.स. २०१५:श्रीरामपूर, महाराष्ट्र) शिक्षण व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. भारताचे माजी मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे हे रावसाहेबांचे ज्येष्ठ बंधू होत.
रावसाहेब शिंदे यांनी पाडळी व देवठाण (नाशिक) येथे प्राथमिक शालेय शिक्षण घेतले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सिन्नर व नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व संगमनेरच्या पेटिट विद्यालयात झाले. नगर, कोल्हापूर व पुणे येथे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. ते बी.ए. एलएल.बी. होते.
रावसाहेब शिंदे
यामागील विज्ञान आणि इतिहास.