राम पुनियानी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

राम पुनियानी

प्रा. राम पुनियानी लेखक आहेत. हे २००० सालापासून भारतात धर्मनिरपेक्षवादी विचारांची मांडणी करीत आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसात्मक हल्ल्याच्या चौकशी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पुनियानी यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. संघाच्या हुकुमशाही विचारांवर त्यांनी सडेतोड विचार मांडले आहेत. इंदिरा गांधी नॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅवॉर्ड आणि नॅशनल कम्युनल हार्मनी अ‍ॅवॉर्ड या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

पुण्यात २१ आणि २२ मे २०१६ रोजी झालेल्या १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१४व्या विद्रोही साहित्य संमेलनातील परिसंवादांचे विषय :



असहिष्णू साहित्य संस्कृतीचा भूतकाळ आणि आजचे वास्तव

भारतीय राष्ट्रवादाचा पाया - बौद्ध तत्त्वज्ञान

कृषी संस्कृती उद्ध्वस्त होत आहे

समरसता, सामाजिक समता आणि जातिअंत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →