राणी गाइदिन्ल्यू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

राणी गाइदिन्ल्यू

राणी गाइदिन्ल्यू (जानेवारी २६, १९१५ - फेब्रुवारी १७, १९९३) ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या. ज्यांनी भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले.

वयाच्या १३ व्या वर्षी त्या हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एका राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या.

१९३२ मध्ये १६ वर्षांच्या असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.१९३७ मध्ये जवाहरलाल नेहरू त्यांना शिलाँग कारागारात भेटले आणि त्यांनी गाइदिन्ल्यू यांची सुटका करण्याचे वचन त्यांना दिले.नेहरूंनी त्यांना "राणी"ही पदवी दिली.

१९४८ मध्ये त्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेल मधून सुटून आल्या.आपल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्याला भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →