केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी जे निर्देश दिले त्या उपाययोजना तत्पुर्वीच राज्याने अंमलात आणल्या. सद्यःस्थितीत मंत्रालयात २०३ या क्रमांकाच्या रुममध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता.तो जागे अभावी आरोग्य भवनमधूनच येथे हलवला गेला, स्वाईन फ्ल्यू विषयी सर्व प्रकारची सविस्तर माहिती या कक्षातून मिळेल. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक २२०९०७० असा आहे. या नियंत्रण कक्षात स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सर्वेक्षणात फ्लूसारखी लक्षणे रुग्णात आढल्यास त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा रोग फैलू नये यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
केंद्र शासनातर्फे राज्यात समन्वयाचे कार्य पुण्यातील केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे विभागीय संचालक करीत आहेत.
राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष (महाराष्ट्र)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.