राजेश खन्ना

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

राजेश खन्ना

राजेश खन्ना, जन्म नाव जतीन खन्ना, (२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरें सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.

काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती.

त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.

"आनंद" व "अमर प्रेम" हे विशेष उल्लेखनीय चित्रपट.

सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि. लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरुणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.खन्नाच्या फोटो सोबती असंख्य तरुणींनी लग्न लावले होते.त्यांची कार तरुणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची.

लोकप्रियतेची एवढी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाहि स्टार गाठु शकला नाही.

राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला परंतु त्याचा परिणाम राजेश खन्‍नां वर झाला नाहि..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →