राजेंद्र अकेरकर हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. अप्लाइड मॅथेमॅटिक्स आणि कम्प्युटरमध्ये पदवी घेऊन ते आणि कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) या संस्थेतून अध्यापन करू लागले. तिथे ते कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख झाले. तेच राजेंद्र अकेरकर आज नॉर्वेतील वेस्टर्न नॉर्वे रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर आणि वरिष्ठ संशोधक म्हणून काम करीत आहेत. त्यांचे सध्याचे संशोधन हे ’भाषा आणि अध्ययन’ यावर केंद्रित आहे.
राजेंद्र अकेरकर हे इंटरनॅशनल स्कूल ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये व नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागात अतिथी प्राध्यापक तसेच व्हिएतनाममधील हॅनोई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्या अनेक संस्थांमध्ये अध्यापक आहेत.
ई कॉमर्स , सिमॅन्टिक टेक्नॉलॉजीज , कॉग्निटिव्ह टेक्नॉलॉजी आणि डाटा मायनिंग विषयक विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत अकेरकरांचा सक्रिय सहभाग असतो. कॉम्प्युटर सायन्ससंबंधी आंतरराष्ट्रीय जर्नल्सच्या संपादकीय मंडळांतही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांचे १००हून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत.
राजेंद्र अकेरकर यांना आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेत सुमारे १८ वर्षे संशोधन आणि अध्यापनाचा अनुभव आहे. १९९७ ते २००५ या काळात १८५ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर्स प्रोजेक्ट तर ६२ विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सच्या क्षेत्रांत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत.
राजेंद्र अकेरकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?