राजशेखर हा इ.स.च्या १०व्या शतकात होऊन गेलेला महाराष्ट्री प्राकृत व संस्कृत भाषांतील नाटककार, कवी होता. गुर्जर प्रतिहारांचा राजा पहिला महेंद्रपाल याच्या राजसभेत हा कवी होता. याने लिहिलेले महाराष्ट्री प्राकृतातील कर्पूरमंजरी हे नाटक विशेष ख्यात आहे. खेरीज बालरामायण हे संस्कृत नाटक, काव्यमीमांसा नावाचा काव्यशास्त्राची मीमांसा करणारा संस्कृत ग्रंथ इत्यादी साहित्यकृतींचाही हा कर्ता आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजशेखर (नाटककार)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.