महाराष्ट्री भाषा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

महाराष्ट्री अथवा महाराष्ट्री प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. मराठी, कोकणी या आधुनिक भाषा महाराष्ट्रीपासून उद्भवल्या आहेत.

ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. अनेक प्राचीन नाटकांतील पात्रांच्या तोंडी या भाषेचा वापर होत असे. सातवाहन सम्राट हाल याने गाहासत्तसई नामक काव्यसंग्रह महाराष्ट्रीत रचला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →