राजमोहन उन्नीथन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राजमोहन उन्नीथन (जन्म १० जून १९५३) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता व राजकारणी आहे जो कासारगोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभेचा सदस्य आहे. तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सदस्य आहे.

ते केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते होते. उन्नीथन यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कासारगोड मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) उमेदवार केपी सतीश चंद्रन यांच्या विरोधात ४०,४३८ मतांच्या फरकाने विजय मिळवला. उन्नीथन यांनी कासारगोड मतदारसंघातून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) उमेदवार एम.व्ही. बालकृष्णन यांच्या विरोधात १,००,६४९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. मल्याळम चित्रपटांमध्येही त्यांनी काही राजकीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. द टायगर (२००५) हा त्याचा पहिला सिनेमा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →