राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय होय.
ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल (धर्मनिरपेक्ष), अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम, द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
२०१८ साली,
देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
देशातील ९८ पक्षांच्या नावात 'विकास' हा शब्द आहे.
देशातील ८७ पक्षांच्या नावात 'क्रांती किंवा क्रांतिकारी' हे शब्द आहेत.
देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तमिळनाडू या राज्यांत आहेत.
उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.
राजकीय पक्ष
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.