राइनहार्ड हेड्रिक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राइनहार्ड हेड्रिक

राइनहार्ड ट्रिस्टन युजेन हेड्रिक ( HEYE -drik ; जर्मन: [ˈʁaɪnhaʁt ˈtʁɪstan ˈʔɔʏɡn̩ ˈhaɪdʁɪç] (७ मार्च, १९०४ – ४ जून, १९४२) हा नाझी जर्मनीचा उच्चाधिकारी होता. हा एसएसचा मुख्याधिकारी आणि ज्यूंच्या शिरकाणाचा मुख्य रचनाकार होता.

याशिवाय हेड्रिक गेस्टापोचाही मुख्याधिकारी होता. हा १९४२मध्ये आत्ताच्या इंटरपोलचाही मुख्याधिकारी होता. जानेवारी १९४२ च्या वॅन्सी परिषदेत त्याने" ज्यूंच्या प्रश्नाचे अंतिम समाधान " ही सर्व ज्यूंची हद्दपारी आणि नरसंहार करण्याच्या योजनांचे सूतोवाच केले.

अनेक इतिहासकार हेड्रिकला नाझी राजवटीतील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक मानतात; अॅडॉल्फ हिटलरने त्याचे वर्णन "लोखंडी हृदय असलेला माणूस" असे केले. हेड्रिकने अटक, हद्दपारी आणि खून याद्वारे नाझी पक्षाला विरोध करण्याऱ्यांची विल्हेवाट लावण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ९-१० नोव्हेंबर १९३८ मधल्या रात्रीत त्याने संपूर्ण नाझी जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या काही भागांमध्ये ज्यूंच्या विरुद्ध समन्वित हल्ल्यांची मालिका, क्रिस्टलनाख्टचे आयोजन करण्यास मदत केली. हे हल्ले एसएस स्टॉर्मट्रूपर्स द्वारे करविले गेले. प्रागमध्ये आल्यावर, हेड्रिचने चेक संस्कृतीची दडपशाही करून आणि झेक प्रतिकारातील सदस्यांना तडीपार करून किंवा मृत्युदंड देऊन नाझींना होणारा विरोध दूर केला.

२७ मे, १९४२ रोजी ऑपरेशन अँथ्रोपॉइड मध्ये त्याच्यावर झेक आणि स्लोव्हाक सैनिकांच्या तुकडीने हल्ला केला ज्यात हेड्रिक प्राणांतिक जखमी झाला. ४ जून रोजी हेड्रिक मरण पावला. नाझी हेरांनी हेड्रिकचे मारेकरी लिडिस आणि लेझाकी या गावांतून आल्याचे खोटेचे दाखवले आणि दोन्ही गावे उद्ध्वस्त केली. या गावांतील १३ वर्षांवरील सगळ्या पुरुष आणि मुलांना गोळ्या घालून ठार केले आणि बहुतेक महिला आणि मुलांना नाझी छळ छावण्यांमध्ये हद्दपार करून त्यांची हत्या करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →