रवी बासवानी आपल्या विनोदी भूमिकांसाठी भारतात लोकप्रिय होते. सई परांजपे यांच्या चश्मेबद्दूर (१९८१) आणि कुंदन शाह यांच्या जाने भी दो यारों (१९८३) मधिल त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. त्यांच्या विनोदाचे टायमिंग अचूक असे आणि विनोद चेहऱ्याच्या हावभावातून व्यक्त करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. जाने भी दो यारों मधील त्यांच्या भुमिकेला १९८४चा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेर पुरस्कार त्यांना मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रवी बासवानी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?